Nanded Cloudburst : ही ढगफुटी की आणखी काय? घर-दारं, वाहनं अन् गुरं-ढोरं सगळं पाण्यात… नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार, पूरस्थिती गंभीर
नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. मुखेड तालुक्यातील लेंडी धरणातून सध्या विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नायगाव या शहरातील दुकानां आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय पाहूयात या पुराची परिस्थिती.
नांदेड जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात विशेषतः कंधार, लोहा, मुखेड, नायगाव आणि नरसी तालुक्यांमध्ये ढगफुटी सारख्या पावसानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आलेत. रस्ते महामार्ग आणि शेती पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झालंय.
नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात पाणी शिरलंय. नायगाव शहरातील रस्ते दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरलंय. ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या म्हशीला वाचवण्याचा प्रयत्न केला. खासदार रवींद्र चव्हाण आणि माणिकराव ठाकरेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. नायगावमध्ये आयशर वाहनावर एका व्यक्तीने आश्रय घेतला होता. नायगावमध्ये सकाळपासूनच अडकलेल्या 20 ते 25 जणांची सुटका करण्यात आली. नांदेड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हे बचाव कार्य केले.
कंधार तालुक्यातील चिखली गावात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने गावात पाणीच पाणी झाले. घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी नागरिकांना नदिकाठच्या गावातून स्थलांतर करण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
