प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल, सरकारी ताफ्यात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर; आदित्य ठाकरे यांची घोषणा

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल, सरकारी ताफ्यात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर; आदित्य ठाकरे यांची घोषणा

| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 7:21 PM

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आता यापुढे सरकारी ताफ्यातील सर्व गाड्या या इलेक्ट्रीक असणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई : देशात वायू  प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिल्लीसह मुंबईमध्ये देखील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत असल्याचे दिसून येत आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आता यापुढे सरकारी ताफ्यातील सर्व गाड्या या इलेक्ट्रीक असणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनाच्या वापराचा निर्णय घेतला असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.