मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई हायकोर्टाचा दणका; ५ जणांना तुरूंगवास, काय आहे प्रकरण?

मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई हायकोर्टाचा दणका; ५ जणांना तुरूंगवास, काय आहे प्रकरण?

| Updated on: Aug 31, 2023 | 8:54 PM

VIDEO | न्यायालयीन आदेशाचा अवमान करणं मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडलं चांगलंच महागात, मुंबई हायकोर्टानं दिला दणका...काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३ | मुंबई हायकोर्टानं मंत्रालयातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. या अधिकाऱ्यांना तब्बल महिनाभराचा तुरूंगवास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाचा अवमान करणं या सर्व अधिकाऱ्यांच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. यामध्ये मदत आणि पुनर्वसन खात्याच्या सचिव असिम गुप्ता यांचा सहभाग असून यांच्यासह विजयसिंग देशमुख, उत्तम पाटील, प्रविण साळुंखे, तलाठी सचिन काळे यांना शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांनी ती भोगावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणात त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र सरकारी पक्षाने माफी मागितलयानंतर शिक्षेला आठवड्याची स्थगिती देण्यात आली आहे. तर या प्रकऱणी आता ८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Published on: Aug 31, 2023 08:54 PM