Imtiaz Jaleel : माझं नाव ऐकुन ते रात्री उठतात, मी स्वप्नात येतो; जलील यांचा शिरसाटांना मिश्किल टोला
Imtiaz Jaleel Statement : छत्रपती संभाजीनगर येथे आंबेडकरवादी संघटनांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा काढत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
मी संजय शिरसार यांच्या स्वप्नात देखील येतो. ते झोपेतून उठून बसतात, आता जलील कोणती पत्रकार परिषद घेईल म्हणून, असा मिश्किल टोला छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांना लगावला आहे. माझे नाव ऐकून आता ते रात्री पण उठतात. पण मी येत्या एक-दोन दिवसांतच मोठी पत्रकार परिषद घेणार आहे, असंही यावेळी जलील यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज एमआयएमचे माजी खासदार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. त्यांच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय-अत्याचार कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यासंपूर्ण प्रकरणावर जलील यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे बोलताना इम्तियाज जलील यांनी सांगितलं की, माझ्यावर फक्त आरोप करून विषयाला कसे बाजूला करता येईल आणि संजय शिरसाट यांना मदत कशी होईल यासाठी हे सगळे नाटक सुरू आहेत. तीन दिवसापूर्वी त्यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी संजय शिरसाट म्हणाले होते की इम्तियाज जलील यांनी जे बोलले आहे ते नाही विचारले तरच मी बसणार इथे. तेव्हा पत्रकारांनी म्हटले हो आम्ही नाही विचारात. तुम्ही तिथे पत्रकारिता दाखवा, त्यांना प्रश्न विचारून दाखवा. प्रश्न विचारला असता तर ते उठून जातानाचे रेकॉर्ड करायला पाहिजे होते. मात्र जेव्हा त्यांना समजले की आपण याचे उत्तर देऊ शकत नाही, कारण एवढे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. तेव्हा एससी समाजाच्या स्वयंघोषित नेत्यांनी समाजात असे वातावरण निर्माण केले की इम्तियाज जलील जातीवादी आहे, त्याने अशा शब्दाचा वापर केला म्हणून आमची भावना दुखावली गेली. मी 10 वर्ष या शहराचा लोकप्रतिनिधी होतो. आमदार होतो, जिल्ह्याचा खासदार आहे. कोणीही माझ्यावर बोट ठेऊन हे सांगू शकत नाही की मी जातीवाद करतो. कारण मी सर्व धर्माचा आदर करतो, असंही यावर बोलताना जलील यांनी म्हंटलं आहे.
