फॉरेस्टवाले इतके निक्कमे आहेत, Nitin Gadkari यांनी अधिकाऱ्यांना झापलं

फॉरेस्टवाले इतके निक्कमे आहेत, Nitin Gadkari यांनी अधिकाऱ्यांना झापलं

| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 9:27 PM

काम न करणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे गोपीनय अहवाल (CR) खराब करणार असल्याचा इशारा नितिन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी आज भंडारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आज जाहीर सभेत भंडारा वन विभागातील काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

भंडारा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा जिल्ह्यातील सहापदरी बायपासच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नितीन गडकरी भंडारा जिल्ह्यात आहेत. या क्रार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर (Forest Department Officer) संतापले, असल्याचं दिसून आलं. काम न करणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे गोपीनय अहवाल (CR) खराब करणार असल्याचा इशारा नितिन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी आज भंडारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आज जाहीर सभेत भंडारा वन विभागातील काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.