VIDEO : Hemant Nagrale | बुली बाई अॅप प्रकरणात तिघांना अटक, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

| Updated on: Jan 05, 2022 | 3:01 PM

सोशल मीडियावरच्या (Social Media) काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो एका वेबसाईटवर (Website) लोड करण्यात आले होते. या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या App आणि साईटविरोधात गुन्हा दाखल केला.

Follow us on

सोशल मीडियावरच्या (Social Media) काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो एका वेबसाईटवर (Website) लोड करण्यात आले होते. या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या App आणि साईटविरोधात गुन्हा दाखल केला. 31 तारखेला हा App लोड करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. हा ऍप, तसंच ज्या ट्वीटर हॅन्डलवरुन या ऍपची माहिती दिली जात होती, त्याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली. तपास केला. या ट्विटर हॅन्डलचे फॉलोअर्स कोण आहेत, त्याची माहिती काढून त्यांच्या मागावर मुंबई पोलीस लागले असता, त्यातून अधिक धागेदोरे हाती लागत गेले. या वादग्रस्त Appप्रकरणी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून दोघांना मुंबईतही आणण्यात आलं आहे.