प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

| Updated on: Jan 11, 2026 | 10:48 PM

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्क मैदानात धडाडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा हे मुंबईचे लचके तोडताना पाहणार का असा सवाल केला.

शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय असावा हे तुमच्या लक्षात आले असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की संयुक्त महाराष्ट्र आंदोलन एसएम जोशी होते, डांगे होते. पहिले जे पाच होते त्यात आमचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते. ही आमची घराणेशाही म्हणा की घराण्याचे प्रेम म्हणा.मराठीचं प्रेम, मातृभाषेचं प्रेम रक्तात असावं लागतं. आमच्या डोळ्या देखतच लचके तोडत असतील तर बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा हे काय लचके तोडताना पाहणार आहेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, ‘मराठीसाठी एकत्र आलोत. आमच्यात वाद नव्हते. ते वाद आम्ही गाडून टाकले आहेत. मराठी आणि हिंदुंसाठी एक आलो आहोत. महापालिकेची निवडणूक आहे. भाजप काय करतं. पूर्वी विकृत डान्स होता. रोम्बासोम्बा म्हणायचे. लोकांनी विरोध केल्यावर तो बंद झाला. तसंच प्रत्येक निवडणुकीत भाजप रोम्बासोम्बा डान्स करत आहेत.फडणवीस म्हणाले होत की उद्धव ठाकरेंचे एक विकासाचं भाषण दाखवा, मी हजार रुपये देतो याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले नको चोराचा पैसा नको. मोदींपासून तुम्ही लोकांनी तुमचं एक भाषण हिंदू मुस्लिम शिवायचं दाखवा एक लाख रुपये देतो असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी चॅलेंज दिले.

Published on: Jan 11, 2026 10:48 PM