चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ; धानोरा-भोयेगाव-गडचांदूर मार्ग बंद

| Updated on: Jul 28, 2023 | 1:38 PM

सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे चंद्रपूरमध्ये वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Follow us on

चंद्रपूर, 28 जुलै 2023 | सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे चंद्रपूरमध्ये वर्धा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण, बेंबाळ प्रकल्प आणि वेण्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वर्धा नदीचं पाणी पुलावरून जात असल्यामुळे धानोरा-भोयेगाव-गडचांदूर हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच आज सकाळ पासून बल्लारपूर-बामनी-राजुरा हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे.