WITT Summit 2026 | जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण; लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था – रामू राव जुपल्ली

WITT Summit 2026 | जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण; लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था – रामू राव जुपल्ली

| Updated on: Mar 24, 2026 | 11:05 AM

काल 'What India Thinks Today Summit 2026' या समिटचा भव्य शुभारंभ झाला. या कार्यक्रमात 'माय होम ग्रुप'चे एक्झुकेटिव्ह व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या जगभरात अनेक संकटे आणि आर्थिक अडचणी आहेत, पण अशा परिस्थितीत भारत एक मजबूत आणि सकारात्मक उदाहरण म्हणून पुढे येत आहे.

काल ‘What India Thinks Today Summit 2026’ या समिटचा भव्य शुभारंभ झाला. या कार्यक्रमात ‘माय होम ग्रुप’चे एक्झुकेटिव्ह व्हाईस चेअरमन रामू राव जुपल्ली यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या जगभरात अनेक संकटे आणि आर्थिक अडचणी आहेत, पण अशा परिस्थितीत भारत एक मजबूत आणि सकारात्मक उदाहरण म्हणून पुढे येत आहे. संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. भारतावरही या संकटांचा परिणाम झाला आहे, पण तरीही आपल्या देशाची काम करण्याची पद्धत आणि ठाम निर्धार यामुळे भारत इतर देशांसमोर वेगळा ठरत आहे, असं रामू राव जुपल्ली यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की जग भारताच्या तरुणांकडे आशा आणि विश्वासाने पाहत आहे. कारण भारताकडे मजबूत लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता आहे, ही भारताची मोठी ताकद आहे. मोदींच्या नेतृत्वामुळे भारत वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. सध्या भारताची अर्थव्यवस्था दरवर्षी सुमारे 7% दराने वाढत आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. मजबूत आर्थिक धोरणांमुळे भारत जागतिक रोजगार बाजारातही बदल घडवत आहे. भारताचा “डिजिटल फर्स्ट” दृष्टिकोन खास आहे, कारण तो सीमांपेक्षा प्रतिभेला महत्त्व देतो. हे सर्व देशातील तरुण आणि डिजिटल विकास यावर भर दिल्यामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे देशात काम करणे सोपे झाले आहे आणि लोकांच्या जीवनशैलीतही सुधारणा झाली आहे, असं देखील रामू राव जुपल्ली म्हणाले.

Published on: Mar 24, 2026 11:05 AM
Follow Us