जीएसटीचे नव्या दरांचा घरगुती वस्तूंच्या किमतींवर परिणाम होणार!

जीएसटीचे नव्या दरांचा घरगुती वस्तूंच्या किमतींवर परिणाम होणार!

| Updated on: Sep 21, 2025 | 5:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GST दर कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे घर, टीव्ही, फ्रीज, कार आणि बाईकसारख्या वस्तूंच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. नवीन सुधारणांमुळे रोजच्या वापरातील बहुतेक वस्तूंवर 5% किंवा 18% टॅक्स लागेल, ज्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळेल. यामुळे मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी दर कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन सुधारणांनुसार, रोजच्या वापरातील बहुतेक वस्तूंवर फक्त 5% किंवा 18% टॅक्स लागेल. पूर्वी 12% टॅक्स असलेल्या वस्तूंपैकी 99% वस्तू आता 5% टॅक्सच्या गटात येत आहेत. याचा अर्थ असा की, घर, टीव्ही, फ्रीज, कार आणि बाईकसारख्या वस्तूंच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. खाणे-पिणे, औषधे, साबण, कपडे आणि इतर अनेक आवश्यक वस्तू आणि सेवांवरही टॅक्स कमी होईल किंवा त्यांना टॅक्समुक्त करण्यात येईल. सरकारचा दावा आहे की यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठी मदत मिळेल. या नवीन जीएसटी सुधारणा केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांचे फळ आहेत.

Published on: Sep 21, 2025 05:35 PM