Pahalgam Attack : भारताकडून ‘पाक’ची कोंडी, तब्बल 20 देशांना दिली ‘ही’ मोठी माहिती, आता पाकिस्तान ‘चेकमेट’ होणार?

Pahalgam Attack : भारताकडून ‘पाक’ची कोंडी, तब्बल 20 देशांना दिली ‘ही’ मोठी माहिती, आता पाकिस्तान ‘चेकमेट’ होणार?

| Updated on: Apr 24, 2025 | 7:25 PM

भारताकडून कोंडी करणं सुरू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीच वातावरण आहे. हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात नाही असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हंटलय.

भारताच्या कारवाईच्या घोषणेनंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळतंय. भारताकडून 20 देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचं म्हंटलय. भीतीमुळे पाकिस्तान हवाई दलाची विमाने रात्रभर सीमेभोवती गस्त घालत होती. पाकिस्तानाने त्यांच्या नौदलांना अलर्ट केल्याची माहिती मिळतेय. तर भारत कारवाईसाठी नौदलाचा वापर करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भारत पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करेल थांबणार नाही असं पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हंटलय.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लंडनहून पाकिस्तानमध्ये परतण्याचा निर्णय घेतलाय. भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केलीये. 20 हून अधिक देशांच्या राजदूतांना बोलावून हल्ल्याची माहिती दिलीये. यात अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सह इतर देशांचाही समावेश आहे.

Published on: Apr 24, 2025 07:25 PM