भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन महादेव’; पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान

भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन महादेव’; पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान

| Updated on: Jul 28, 2025 | 7:35 PM

भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन महादेव' सुरू असून पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे, भारतीय सैन्याने पाकिस्तानी हाशिम मुसाला आणि
सुलेमानला कंठस्नान घातलं आहे. श्रीनगरजवळ भारतीय सैन्याचं ‘ऑपरेशन महादेव’ सुरू आहे. त्याच अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

मुसा सुलेमान याने पाकच्या पंजाबमधील लष्कर-ए-तैय्यबाच्या मुरीदके सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. हाशिम मुसा पाकिस्तानी आर्मीच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो होता. हाशिम मुसानं पाकिस्तानी सैन्यात काम केलेलं होतं. ISIच्याच सांगण्यावरुन दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा सोबत काम करायचा.  मुसाला भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकांनाही लक्ष्य करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. हल्ल्यासाठी काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांनाही मुसानं सोबत घेतलं. पहलगामच्या बैसरन घाटीतल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गांदरबलच्या गागनगीरमध्ये मूसानं हल्ला केला होता. ऑक्टोबर 2024 मध्येच बुटा पाथरीच्या हल्ल्यातही मुसाचाच हात होता, ज्यात 2 जवान शहीद झाले होते.

Published on: Jul 28, 2025 07:35 PM