India Pakistan Ceasefire Update : जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर

India Pakistan Ceasefire Update : जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर

| Updated on: May 11, 2025 | 12:59 PM

Jaisalmer Latest News : भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रबंदीनंतर जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमधील परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रबंदीनंतर जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमधील परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी आता शांततेचं वातावरण बघायला मिळत आहे.

भारत पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. सीमेलगतच्या सगळ्याच गावांना यामुळे फटका बसला होता. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे इथले जनजीवन विस्कळीत झालेले होते. रेड अलर्ट आणि रात्रीच्यावेळी होणाऱ्या ब्लॅकआऊटमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण होतं. काल शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्यावर दोन्ही देशांनी एकमत केल्यानंतर आता या सर्व शहरांमध्ये आता परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. बाजारपेठा हळूहळू उघडत असल्याचं दिसून आलं आहे.

Published on: May 11, 2025 12:57 PM