India Legal Strike on Pakistan : भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न

India Legal Strike on Pakistan : भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न

| Updated on: Apr 25, 2025 | 10:18 AM

Pakistan shuts Wagah border : भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या 5 मोठ्या निर्णयांमुळे आता पाकिस्तानला धडकी भरली आहे. त्यामुळे सिंधु जल करार स्थगित करणं म्हणजे युद्धासारखी कारवाई करणं अशी डरपोक्ती पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.

भारताच्या कायदेशीर स्ट्राईकनंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकिस्तानकडून देखील भारतावर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानने म्हंटलं आहे. तसंच सर्व भारतीयांना 30 एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत.

भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या 5 मोठ्या निर्णयांमुळे आता पाकिस्तानला धडकी भरली आहे असंच म्हणावं लागेल. सिंधु जल करार स्थगित केल्याचं भारताने जाहीर केल्यावर पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई करणं अशी डरपोक्ती पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. भारताने बॉर्डर बंद केल्यानंतर आता पाकिस्तानने देखील वाघा बॉर्डर बंद केली आहे. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. भारतीयांना दिलेला व्हिसा देखील रद्द केलेला आहे. शिमला करार संपवण्याचा इशाराही पाकिस्तानकडून देण्यात आला आहे. द्विपक्षीय व्यापार देखील पाकिस्तानने बंद केला आहे.

Published on: Apr 25, 2025 10:16 AM