India vs Pakistan Conflict : भारत-पाकसाठी आजचा दिवस ‘मोठा’, दोन्ही देशांच्या DGMO च्या बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी काय झाली चर्चा?
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी दोन्ही देशांच्या डीजीएमओ कार्यालयांमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे ज्यामध्ये दोघेही आपले विचार मांडतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसह सीडीएस देखील बैठकीसाठी उपस्थित आहेत. भारत पाकिस्तानच्या DGMO यांच्यात होणाऱ्या आजच्या महत्त्वाची चर्चेपूर्वी मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. देशाचे संरक्षणमंत्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत. भारत पाकच्या DGMO यांच्या बैठकीत पीओकेसंदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर पाकव्याप्त काश्मीर परत घ्या अशी भारताकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. तर पाकिस्तानने दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं असंही भारताकडून सांगण्यात आलं आहे. भारत पाकच्या DGMO यांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काय झाली चर्चा? यापुढे भारताची भूमिका काय असणार?
Published on: May 12, 2025 12:40 PM
