India vs Pakistan War : पाक सेनेसाठी ‘तबाही’ची सकाळ, भारताने ‘हे’ 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवलं
भारताने या चार एअरबेसला उद्ध्वस्त करत पाकिस्तानची २ विमानं नेस्तानूभूत केलंय. तर १ लाँच पॅड उद्ध्वस्त करत फतेह मिसाईल खाक केले आहे. फतेह हे मिसाईल भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्ताने पाठवलं होतं. मात्र ते मिसाईल भारताकडून नष्ट करण्यात आलंय.
पाकिस्तानकडून अद्याप भारतावर हल्ला करण्याचे प्रयत्न सुरूच आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये पाककडून हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठवण्यात आला होता. मात्र भारताने हा हल्ला परतून लावला आहे. यासोबतच भारताने पाकिस्तानचा रहिमयार खान एअरबेस उद्ध्वस्त केला आहे. हा एअरबेस जैसलमेरपासून अगदी जवळ असल्याची माहिती आहे. भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईंतर्गत पाकिस्तानच्या तोंडचं चांगलंच पाणी पळालं आहे. असे असताना पाकड्यांचा माज काही उतरत नसल्याचे दिसतेय. पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले होत असल्याचे पाहायला मिळतंय. अशातच भारतीय लष्कराकडून देखील पाकला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. भारताने पाकचा डाव उधळून लावत पाकच्या रावळपिंडी, चकलाल, शेरकोट, रहीमयार एअरबेसवर स्फोट घडवून आणत ते पूर्णतः उद्ध्वस्त केले आहे.
Published on: May 10, 2025 10:27 AM
