Jammu Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, लष्कर ए तोएबाचा कमांडर ठार

Jammu Kashmir | जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, लष्कर ए तोएबाचा कमांडर ठार

| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 4:00 PM

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सैनिकांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडेला याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. घाटीमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे.

जम्मू -काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगलात सैन्य दलाकडून शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सैनिकांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडेला याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. घाटीमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. या दरम्यान, कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसरसह (जेसीओ) दोन सैनिक शहीद झाले. दोन जवानांच्या मृत्यूमुळं आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांची संख्या 9 वर पोहोचली आहे. पुंछच्या सुरणकोटे जंगलात सोमवारी सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ सैनिक शहीद झाले आहेत. पुढे ही शोधमोहीम पुंछमधील मेंढर आणि राजौरीतील थानामंडीपर्यंत सुरु आहे.