Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधनाच्या लग्नासाठी सांगली सजली, शाही विवाहाला कोण-कोण लावणार हजेरी?
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आज संगीतकार पलाश मुच्छलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सांगलीतील मानधना फार्म हाऊसवर शाही विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आज संगीतकार पलाश मुच्छलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सांगलीतील कवठेपिरान रोडवरील मानधना फार्म हाऊसवर या शाही विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी साडेतीन वाजता हा विवाह संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी भारतीय संघातील महिला खेळाडूंसह विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींसह अनेकांनी स्मृतीला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पलाश मुच्छल हे संगीतकार असून त्यांनी भूतनाथ रिटर्न्ससह अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. काही सिनेमांमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे. क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे.
Published on: Nov 23, 2025 10:52 AM
