Indurikar Maharaj : …या औलादी माझ्या मुळावर उठणार, आता मी सांगतो मुलीचं लग्न… इंदुरीकर महाराजांचं ट्रोल करणाऱ्यांना थेट चॅलेंज

Indurikar Maharaj : …या औलादी माझ्या मुळावर उठणार, आता मी सांगतो मुलीचं लग्न… इंदुरीकर महाराजांचं ट्रोल करणाऱ्यांना थेट चॅलेंज

| Updated on: Nov 15, 2025 | 11:43 PM

कीर्तनकार इंदुरीकर महाराज त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यानंतर होणाऱ्या टीकेमुळे संतप्त झाले आहेत. टीका करणाऱ्यांना उद्देशून त्यांनी म्हटले की, मी मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही मोठं करणार. त्यांनी माध्यमांवरही टीका केली, 30 मिनिटांच्या सेवेला 3 कोटी खर्च आहे. पैसे कुठून आले, हे चॅनलवाल्यांना विचारा. ही विकली गेलेली लोकं असून, त्रास देण्यालाही मर्यादा असल्याचे महाराज म्हणाले.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यानंतर विविध स्तरांतून होणाऱ्या टीकेला तीव्र शब्दांत प्रत्युत्तर देताना दिसले. टीका करणाऱ्यांवर ते चांगलेच भडकले आहेत. इंदुरीकर महाराजांनी स्पष्ट केले की, मी मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा देखील मोठं करणार. त्यांनी टीकाकारांना आव्हान देत म्हटले की, मला माहीत होतं या औलादी माझ्या मुळावर उठणार आहेत. त्यांना चॅलेंज सांगतो मुलीचं लग्न मी याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे, भुंकू नका.

महाराजांनी आपल्या वक्तव्यात पैशांच्या खर्चावरही भाष्य केले. 30 मिनिटांच्या सेवेला 3 कोटी खर्च आहे. कोणत्या चॅनलवाल्यांना विचारा, जाऊन दाखवा पैसे कुठून आणले, असे ते म्हणाले. काही माध्यमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, ही विकली गेलेली लोकं आहेत. आणि किती दुसऱ्याला त्रास द्यावा यालाही मर्यादा आहे, असे संतप्त शब्दांत त्यांनी सांगितले. इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाभोवतीची चर्चा अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

 

 

Published on: Nov 15, 2025 11:43 PM