मतदानाच्या शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर

मतदानाच्या शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेपावर फडणवीसांचे प्रत्युत्तर

| Updated on: Jan 15, 2026 | 4:40 PM

सॅनिटायजर लावल्यावर शाई जातेय असा आरोप ठाकरेंनी केलाय. पेनाची शाई लगेचच निघते अशी तक्रार अनेक लोकांनी केली आहे. मतदान केल्यानंतर लावलेली मार्कर पेनची शाई सहज पुसली जात असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या या मार्कर शाईवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

मतदानानंतर शाईऐवजी पेनाचा आरोप केला जातो असा आरोप मनसे चे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. सॅनिटायजर लावल्यावर शाई जातेय असा आरोप ठाकरेंनी केलाय. पेनाची शाई लगेचच निघते अशी तक्रार अनेक लोकांनी केली आहे. मतदान केल्यानंतर लावलेली मार्कर पेनची शाई सहज पुसली जात असल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या या मार्कर शाईवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलंय अशी टीका ठाकरेंनी केली आहे.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय, लोकशाहीच्या संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अयोग्य आहे. विरोधक उद्याच्या निकालाच्या प्रभावाची तयारी आजपासूनच करत आहेत. पराभवाची स्क्रिप्ट ही विरोधकांकडून आधीच तयार आहेत असं फडणवीस म्हणाले.

Published on: Jan 15, 2026 04:40 PM