डेअरी बंद करा, वायनरी काढा, मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या – सदाभाऊ खोत

डेअरी बंद करा, वायनरी काढा, मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या – सदाभाऊ खोत

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 5:47 PM

गेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य शासनाने वाईन दुकानात (Wine In Kirana Store) आणि सुपरमार्केटमध्ये मिळणार असल्याची घोषणा केली.

नवी दिल्ली : गेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य शासनाने वाईन दुकानात (Wine In Kirana Store) आणि सुपरमार्केटमध्ये मिळणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी या निर्णयाला कडाडून विरोध करण्यास सुरूवात केली. आता या निर्णयावर शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही कडाडून टीका केली आहे. मंदिरात पण्याऐवजी वाईन द्या म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.