IPS Rashmi Karandikar : मी पीडित…माझा छळ… IPS रश्मी करंदीकरांच्या जबाबानं खळबळ, नेमकं प्रकरण काय?
आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी आपल्या पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला आहे. रश्मी करंदीकर यांनी स्वतःला या प्रकरणातील पीडिता म्हणून घोषित केले आहे. चव्हाण यांनी संमतीशिवाय आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांनी आपल्या पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, चव्हाण यांनी केलेले सर्व आर्थिक गैरव्यवहार त्यांच्या संमतीशिवाय करण्यात आले आहेत आणि त्यामुळे त्या पीडिता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे प्रकरण ईओडब्ल्यूकडे आहे आणि सध्या चौकशी सुरू आहे. चव्हाण यांना आधीच आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित तुरुंगवास भोगावा लागला आहे. या प्रकरणात एक नवा ट्विस्ट म्हणजे चव्हाण यांनी घोटाळा करण्यासाठी दिवंगत व्यक्तीच्या नावाचा वापर केल्याचे समोर येत आहे. याशिवाय चव्हाण चार वर्ष शासकीय अधिकारी असल्याचे भासवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. रश्मी करंदीकर यांचा जबाब ईओडब्ल्यूकडे नोंदवण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
Published on: Sep 25, 2025 03:27 PM
