Jagdeep Dhankhad : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती, युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वांचा पराभव

| Updated on: Aug 06, 2022 | 8:38 PM

725 खासदारांनी आपला मतदानाचा हक्क पार पाडला. त्यानंतर हा निकाल हाती आला आहे. धनखड हे राज्यपाल होते. ते राजस्थान राज्याशी संबंधित आहेत. पुढील तीन वर्षांत राजस्थानात निवडणुका होणार आहेत. त्यामुळं धनखड यांना भाजपनं उमेदवारी दिल्याचं बोललं जातं.

Follow us on

नवी दिल्ली : एनडीएचे अधिकृत उमेदवार जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती (Vice President) झाले आहेत. त्यांनी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वांचा पराभव केला. जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) एनडीएचे उमेदवार होते. मतमोजणी झाली आहे. निकाल हाती आले आहेत. त्यानुसार देशाचे नवे उपराष्ट्रपती जगदीप धनखड झाले आहेत. धनखड यांना एकूण 528 मतं मिळाली आहेत. युपीएकडून मार्गारेट अल्वा यांना 181 मतं मिळाली आहेत. 725 खासदारांनी आपला मतदानाचा हक्क पार पाडला. त्यानंतर हा निकाल हाती आला आहे. धनखड हे राज्यपाल होते. ते राजस्थान राज्याशी संबंधित आहेत. पुढील तीन वर्षांत राजस्थानात निवडणुका होणार आहेत. त्यामुळं धनखड यांना भाजपनं उमेदवारी दिल्याचं बोललं जातं.