Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची राजीनामा स्वीकारला

Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची राजीनामा स्वीकारला

| Updated on: Jul 22, 2025 | 1:58 PM

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती आणि इतर अनेक भूमिकांमधून देशसेवेची संधी मिळाली. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी शुभकामना देतो.”

74 वर्षीय धनखड यांनी यावर्षी मार्चमध्ये हृदयाशी संबंधित आजारांमुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात चार दिवस उपचार घेतले होते. रुग्णालयातून सुखरूप परतल्यानंतरही त्यांनी सोमवारी आरोग्याला प्राधान्य देत राजीनामा दिला. त्यांनी वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. हा अनपेक्षित राजीनामा पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या संसदेतील एका खासगी बैठकीनंतर समोर आला, ज्यामध्ये कदाचित याच मुद्द्यावर चर्चा झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 22, 2025 01:58 PM