Jalgaon Gold and Silver Price News | सोनं-चांदीच्या भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे…

| Updated on: Jan 29, 2026 | 3:36 PM

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दराने आज ऐतिहासिक उसळी घेतली आहे. 24 तासांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळीच मार्केट उघडताच सोन्याचे दर 1,80,000 रुपयांवर पोहचले आहे. तर चांदीच्या दराने चार लाखांचा आकडा पार केला आहे.

जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या दराने आज ऐतिहासिक उसळी घेतली आहे. 24 तासांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळीच मार्केट उघडताच सोन्याचे दर 1,80,000 रुपयांवर पोहचले आहे. तर चांदीच्या दराने चार लाखांचा आकडा पार केला आहे. या वाढीमुळे ज्वेलर्स आणि खरेदीदारांचे लक्ष सोन्या-चांदीच्या बाजारावर अधिक वाढले आहे. जागतिक बाजारातील चलनवाढ, डॉलरच्या किंमतीत बदल, आणि मागणी-पुरवठ्याचे संतुलन हे या वाढीचे कारण आहे. त्याचबरोबर अनेक देशांमधील नागरिक हे सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. याचाच परिणाम हा सोने आणि चांदीच्या भावावर होतोय. व्यासायिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे, परंतु ज्यांच्याकडे लग्न आहेत त्यांच्यासाठी ही चिंता वाढवणारी बाब असून त्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. पुढील काही दिवसांत सोने, चांदीच्या भावात अजून बदल होण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Jan 29, 2026 03:36 PM