ऐन थंडीत जळगावाचं राजकीय वातावरण तापलं, गुलाबराव पाटील आणि उन्मेष पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप

| Updated on: Jan 04, 2022 | 9:58 AM

पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप खासदार उन्मेष पाटील सध्या एकमेकांवर जोरदार टीका करताहेत. त्यामुळं ऐन थंडीच्या काळात जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलंय.

Follow us on

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असलेल्या जळगावतील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सातत्यांनं सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यातील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली होती. त्यांच्यातील वाद थांबल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप खासदार उन्मेष पाटील सध्या एकमेकांवर जोरदार टीका करताहेत. त्यामुळं ऐन थंडीच्या काळात जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापलंय.

गिरणा परिक्रमेच्या सुरुवातीलाच उन्मेष पाटलांनी एका पत्रकार परिषदे वाळू चोरीच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटलांना लक्ष्य केलं होतं. कुंपणच शेत खात असल्याची टीका त्यांनी केली होती. जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू चोरील पालकमंत्र्यांचं एकप्रकारे अभय असल्याचा हा अप्रत्यक्षपणे पालकमंत्र्यांना टोला होता. वाळू उपशाचा प्रश्न आताचं निर्माण झालेला नाही. वाळू माफियामध्ये चेतन शर्मा कोणत्या पक्षाचे होते हे खासदारांनी पाहावं, असं प्रतिआव्हान गुलाबराव पाटील यांनी दिली.