Pahalgam Attack: ‘माझ्यासमोर बाबाला गोळ्या, मी त्यांना उठवलं पण …’, डोंबिवलीच्या अतुल मोनेंच्या मुलीनं जे सांगितलं ते मन सुन्न करणारं

Pahalgam Attack: ‘माझ्यासमोर बाबाला गोळ्या, मी त्यांना उठवलं पण …’, डोंबिवलीच्या अतुल मोनेंच्या मुलीनं जे सांगितलं ते मन सुन्न करणारं

| Updated on: Apr 24, 2025 | 2:23 PM

काश्मीरला भेट देण्यासाठी गेलेल्या एका मुलीने दहशतवादी हल्ल्याची थरारक कहाणी सांगितली आहे. ती म्हणाली की, दहशतवाद्यांनी विचारले की हिंदू कोण? माझ्या काकाने हात वर केल्यावर त्यालाही गोळी लागली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या क्रूरतेविरोधात लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकं ठार झाले, त्यामध्ये महाराष्ट्रातील डोंबिवली आणि मुंबईतील तीन जणांचा समावेश असून संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी अशी त्यांची नावं आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यातून सुखरूप घरी परतलेल्या अतुल मोने यांच्या मुलीने पहलागम येथील हल्ल्याची मुलीने मन सुन्न करणारी घटना सांगितली आहे.

‘पहलगामच्या बैसरन खोऱ्यात सगळे पर्यटक फिरण्यासाठी आले होते. सगळं व्यवस्थित सुरू होतं. आम्ही तेथून निघणार त्याच वेळी अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला. या आवाजाने सगळे हादरले. मी स्वतः दोन जणांच्या हातात बंदूक पाहिली. मी घाबरले.. त्या लोकांनी सगळ्यांनी विचारले कोण हिंदू आहेत कोण मुस्लीम आहेत.’

‘संजय काका, हेमंत काका आमच्या सोबत होते. ते गोळीबार करणाऱ्यांना विचारायला गेले की काय झालं आहे. आम्ही काहीच करत नाही आहोत.. पण त्यांनाही गोळ्या घातल्या. माझे बाबा तिथे गेले त्यांनी सांगितलं गोळी नका घालू आम्ही काही करत नाही पण तिथेच माझ्यासमोर त्यांना गोळ्या घातल्या. मी काहीच करू शकले नाही’, असं रूचा मोने यांनी धक्कादायक अनुभव सांगितला.

Published on: Apr 24, 2025 01:29 PM