Rajya Sabha: घोडेबाजार होऊ नये यासाठी भाजप तिसरा अर्ज मागे घेईल असं वाटतंय- जयंत पाटील

Rajya Sabha: घोडेबाजार होऊ नये यासाठी भाजप तिसरा अर्ज मागे घेईल असं वाटतंय- जयंत पाटील

| Edited By: | Updated on: May 30, 2022 | 3:57 PM

भाजपने राज्यसभेसाठी (rajya sabha) तिसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

भाजपने राज्यसभेसाठी (rajya sabha) तिसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे (bjp) धनंजय महाडिक (dhananjay mahadik) असा सामना रंगताना दिसणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. “घोडेबाजार होऊ नये असं भाजपला पण वाटत असेल. त्यामुळे नक्कीच भाजपवाले तिसरा अर्ज मागे घेतील असं वाटतं. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सगळं चित्र स्पष्ट होईल. अपक्ष आम्हाला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे आमची बेरीज बरोबर होत आहे. म्हणून आम्ही सहावा उमेदवार दिला आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.