Jitendra Awhad …तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर? थेट म्हणाले…
नितीन देशमुखांना अटक केल्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोरच कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाडांनी ठिय्या केलं. इतकंच नाहीतर जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली आणि पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचून बाहेर काढल्याचे पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ते आक्रमक झाले. नुसते आक्रमकच झाले नाही तर त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोरच कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाडांनी ठिय्या आंदोलन करत पोलिसांची गाडी अडवून ठेवल्याने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी खंत व्यक्त केली. आम्हाला फसवलं गेलं, अशी माझ्यासहित जयंत पाटलांची भावना असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा संबंधित आमदारांसोबत उभे असलेले गुंडं यांना संबंधित आमदार खुणावतो तेव्हा ते नितीन देशमुखला मारतात. यानंतर मला फोन आला नितीन देशमुखांना पोलिसांनी अटक केली. यावर विचारणा केली तर पोलीस म्हणतात आम्हाला फक्त आदेश दिला की त्याला घेऊन पोलीस स्टेशनला जा.’, असं आव्हाड म्हणाले.
