Jitendra Awhad | ‘बोलायला सुरुवात कशानं करावी हे तुम्ही शिकवणार का?’ आव्हाड- tv9

Jitendra Awhad | ‘बोलायला सुरुवात कशानं करावी हे तुम्ही शिकवणार का?’ आव्हाड- tv9

| Updated on: Aug 16, 2022 | 10:16 AM

तसेच राज्यात आता सामान्यांवर बोलण्यावर अशी जोरजबरदस्ती करू नका असेही आव्हाडांची मुनगंटीवार यांना म्हटलं आहे. तर यावर संवादाची सुरुवात वंदे मातरम् ने व्हावी यामध्ये राजकारण कसले असा प्रतिसवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

मुंबई : राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर तब्बल 40 एक दिवसांनंतर खाते वाटप झाले. यानंतर राज्याची चाके सुरळीत चालतील असे वाटत असतानाच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळ्याच वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणा असे म्हटलं होते. त्यानंतर हे ‘हॅलो’चे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. यावर आता माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सुधीर मुनगंटीवारांवर टीका केली आहे. तसेच आव्हाडांनी, बोलायला सुरुवात कशानं करावी हे तुम्ही शिकवणार का? असा खडा सवालच मुनगंटीवार यांना केला आहे. तसेच राज्यात आता सामान्यांवर बोलण्यावर अशी जोरजबरदस्ती करू नका असेही आव्हाडांची मुनगंटीवार यांना म्हटलं आहे. तर यावर संवादाची सुरुवात वंदे मातरम् ने व्हावी यामध्ये राजकारण कसले असा प्रतिसवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच मुनगंटीवार यांनी, संविधानाने मान्यता दिलेल्या गोष्टीला कोणी विरोध करत असेल तर त्यांचे मन परिवर्तन करु असेही म्हटलं आहे. तर अडीच वर्षे सत्ता असताना ते जो निर्णय घेऊ शकले नाही त्याबाबत विरोध कसा करणार असा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला आहे. तर जितेंद्र आव्हाड राईचा पर्वत करत आहे. वंदे मातरम् नाही म्हटलं ते जेलमध्ये टाकेल असं कुणीही म्हटले नसल्याचेही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.