Jitendra Awhad | महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? लोकांची चिंता वाढली, जितेंद्र आव्हाड यांनी आकडाच सांगितला, म्हणाले….

| Updated on: May 20, 2026 | 1:17 PM

पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी “बुरे दिन येणार आहेत, हे पंतप्रधान मोदी नेदरलँडमध्ये जाऊन का सांगतात?” असा सवाल उपस्थित केला.

आव्हाड म्हणाले की, “2014 साली नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हा ‘अच्छे दिन आने वाले हैं’ असं देशाला सांगितलं होतं. मात्र आता 12 वर्षांनंतर ते परदेशात जाऊन ‘बुरे दिन आने वाले हैं’ असं सांगत आहेत. जर खरंच कठीण काळ येणार असेल तर ते भारतात येऊन जनतेला सांगायला हवं होतं.”

तसेच त्यांनी आगामी काळात पेट्रोलचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करत, “महिन्याभरात पेट्रोल 20 रुपयांनी महागू शकतं आणि याचा सर्वाधिक फटका गरीब जनतेला बसणार आहे,” असा दावा केला.

“लोकांना कसं जगवणार आहात, याचं उत्तर सरकारने द्यावं,” असं म्हणत आव्हाड यांनी महागाई, इंधन दरवाढ आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला.

Published on: May 20, 2026 1:12 PM
Follow Us