Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला सुनावणी होणार
न्यायालयाने 25 जानेवारीपर्यंत कालीचरण महाराजला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर वर्धा पोलिसांनी कालीचरण यांना रायपूर येथील सेंट्रल जेलमध्ये सुपूर्द केले आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर आरोपीच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.
वर्धा : महात्मा गांधींविरोधात रायपूर येथे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजावर वर्धेत सुद्धा गुन्हा दाखल आहे. 12 जानेवारीला कालिचरणला पोलिसांनी वर्धा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र कालीचरण महाराजांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांच्या जमानती अर्ज दाखल करण्यात आला होता. आज तपास अधिकाऱ्यांनी जबाब दाखल केला आहे. जामीन अर्जावर 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
