Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा शिवसेनेकडून युक्तिवाद
अभिषेक मनू सिंघवी यांनीही जोरदार युक्तिवाद केला. बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणं हाय पर्याय आहे. तसं न झाल्यास पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन होईल, असं ते म्हणाले.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा शिवसेनेकडून युक्तिवाद केला. सिब्बल म्हणाले, विधिमंडळात दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळं आम्हीच खरी शिवसेना आहोत, असं शिंदे गटाला म्हणता येणार नाही. विधिमंडळात बहुमत म्हणजे अवघा पक्ष त्यांचा होऊ शकत नाही. मग, अशा बहुमताच्या जोरावर सरकारं पाडली जातील. त्यामुळं दहाव्या परिशिष्टाला अर्थ राहणार नाही. शिवसेनेतून बाहेर गेलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये किंवा इतर पक्षात विलीन होणं अथवा नवा पक्ष स्थापन करणं हाय पर्याय आहे. त्यानंतर शिवसेनेचे दुसरे वकील, अभिषेक मनू सिंघवी यांनीही जोरदार युक्तिवाद केला. बंडखोरांनी दुसऱ्या पक्षात विलीन होणं हाय पर्याय आहे. तसं न झाल्यास पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन होईल, असं ते म्हणाले.
Published on: Aug 03, 2022 08:44 PM
