Karun Munde : …म्हणून माझ्या आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय? धनंजय मुंडेंचं नाव घेत करूणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

Karun Munde : …म्हणून माझ्या आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय? धनंजय मुंडेंचं नाव घेत करूणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

| Updated on: Oct 18, 2025 | 11:38 AM

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत की, त्यांच्या दबावामुळे आईने आत्महत्या केली. आईच्या सुसाईड नोटमध्ये सर्व काही नमूद असल्याचा दावा त्यांनी केला. बहिणीवर झालेल्या बलात्काराच्या न्यायालयीन प्रकरणाचाही उल्लेख करत, करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना थेट राजकीय आव्हान दिले आहे.

करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. करूणा मुंडेंच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे यांच्या दबावामुळे त्यांच्या आईने आत्महत्या केली. करुणा मुंडे यांनी दावा केला की, त्यांच्या आईच्या सुसाईड नोटमध्ये या संदर्भातील सर्व माहिती नमूद आहे. या प्रकरणात, करुणा मुंडे यांनी त्यांच्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा आणि त्यानंतर दाखल झालेल्या न्यायालयीन खटल्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या बहिणीला धमकावून मुंबईतून हाकलून लावल्याचा आरोपही त्यांनी केला.

स्वतःवर सध्या दबाव असल्याचे सांगत, करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना थेट राजकीय आव्हान दिले. परळीमध्ये येऊन त्यांनी आमदारकीचा अर्ज भरला होता, परंतु तो अर्ज रद्द करण्यात आला. त्यांनी धनंजय मुंडेंना मर्द असाल तर आपल्याला अंगावर घेण्याचे खुले आव्हान दिले, तसेच नवरा वर्सेस बायको लढतीची घोषणा केली.

Published on: Oct 18, 2025 11:35 AM