Karuna Munde : धनंजय मुंडेच गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार अन् पंकजाताई… करूणा मुंडेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य
गोपीनाथ मुंडेंचा वारसा नेमका कोण चालवतंय यावर करुणा मुंडेंनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार असून, पंकजा मुंडे या राजकीय वारसदार नसल्याचे करुणा मुंडेंनी म्हटले आहे. विचारांचे राजकारण महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसावरून सुरू असलेल्या चर्चेत आता करुणा मुंडेंनी भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचा खरा राजकीय वारसा चालवतात, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार नसल्याचे त्यांचे स्पष्ट मत आहे.
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या संघर्षाचे दाखले देत सांगितले की, २००९ ते २०१९ पर्यंत मी त्यांच्या संघर्षात सोबत होते. त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले आहे. राजकारणामध्ये वारसदार हे रक्ताचे नसून विचारांचे असावेत, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंनी हे विचार जपले असल्याचे अधोरेखित केले. याआधी छगन भुजबळ यांनीही धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा, असे म्हटले होते. तेव्हापासून पंकजा की धनंजय, या चर्चेला तोंड फुटले होते. आता करुणा मुंडेंनी या चर्चेत धनंजय मुंडेंना बळ दिले आहे. हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
