Karuna Munde : …तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी करूणा मुंडेंचा थेट इशारा

| Updated on: Dec 05, 2025 | 12:59 PM

नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीवरुन करुणा मुंडे यांनी सरकारला तीव्र इशारा दिला आहे. झाडे कापल्यास स्वराज्य शक्ती सेनेचे पदाधिकारी आत्मदहन करतील, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. नाशिकच्या तपोवन भागातील वृक्षतोडीच्या संभाव्य प्रकरणावरून करुणा मुंडे यांनी सरकारला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. हा केवळ धर्माचा मुद्दा नसून निसर्गाचा प्रश्न असल्याचे करुणा मुंडे यांनी ठामपणे सांगितले. “झाडे कापण्याचं पाप करू नका, अन्यथा स्वराज्य शक्ती सेनेचे पदाधिकारी इथे येऊन आत्मदहन करतील,” असे गंभीर वक्तव्य करत करुणा मुंडे यांनी सरकारला अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा दिला. तपोवनातील वृक्षांची कापणी करण्याची कोणतीही गरज नसताना, मोठ्या संतांच्याही मताकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. जर एकही वृक्ष कापला गेला, तर स्वराज्य शक्ती सेनेचा प्रत्येक पदाधिकारी आत्मदहन करेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल, असे आवाहन करुणा मुंडे यांनी केले आहे.

Published on: Dec 05, 2025 12:58 PM