Karuna Sharma : बीडमध्ये तुम्ही घाण केली, सहा महिने गप्प अन् डोळ्यावर चष्मा कारण… करूणा शर्मांचा मुंडेंवर घणाघात
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये झालेल्या निर्धार मेळावा झाला. यामध्ये बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले, वैर माझ्याशी होतं तर बदनामी बीड जिल्ह्याची का केली? असा सवालही त्यांनी केला.
आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी ज्यांनी कोणी केली, भलेही तो बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? असा सवाल धनंजय मुंडेंनी विरोधकांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावरूनच करूणा शर्मा यांनी मुंडेंवर निशाणा साधलाय.
‘धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता. डोळ्यावर चष्मा घातला होता. कारण लोकांच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नाहीत. जी तुम्ही घाण केली त्याची उत्तरं तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्ही गप्प होतात. जनतेच्या डोळ्यात डोळे घालण्याची तुमची लायकी नाही’, असं म्हणत करूणा शर्मांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय. पुढे त्या असेही म्हणाल्या की, मुंडे म्हणताय जिल्ह्याची बदनामी करू नका, तर जिल्ह्याची बदनामी तुमच्यामुळेच झाली आहे. तुमच्या कारनाम्यामुळे झाली आहे.
