Karuna Sharma : तटकरेंवर केलेल्या आरोपांची चौकशी करा, करुणा शर्मांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Karuna Sharma News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना पत्र लिहीत करुणा शर्मा यांनी रणजित कासले याने केलेल्या आरोपांच्या चौकशीची मागणी केली आहे.
बडतर्फ रणजित कासले याने अदिती आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची कारवाई व्हावी अशी मागणी करुणा शर्मा यांनी केलेली आहे. यासंदर्भात करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना पत्र लिहिलं आहे.
तर धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात गेले तरी त्यांना शांती मिळणार नाही, असं देखील करुणा शर्मा यांनी म्हंटलं आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासले पुराव्यासह अनेक खुलासे करत आहे. तरीही त्यावर काहीही कारवाई केली जात नाही. उलट रणजित कासले यांच्यावरच कारवाई करून त्यांना पुन्हा पुन्हा तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी अदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. त्यामुळे मी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांना पत्र लिहिलं आहे आणि चौकशीची मागणी केलेली आहे.
Published on: Jun 02, 2025 12:47 AM
