Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 7 जणांचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 7 जणांचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

| Updated on: Jun 15, 2025 | 12:03 PM

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेदरम्यान रविवारी एक मोठा अपघात झाला. केदारनाथ धामहून गुप्तकाशीला येणारे हेलिकॉप्टर गौरीकुंड परिसरात कोसळले. या दुर्दैवी अपघातात २३ महिन्यांच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला.

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथील गौरीकुंड परिसरात एक मोठा अपघात झाला आहे. रविवारी सकाळी केदारनाथ मार्गावर श्री केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडजवळ कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात जण होते. या दुर्दैवी अपघातात सर्व सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय. केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं असून यवतमाळच्या वणीतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. गौरी कुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले. गौरीकुंड परिसरात ही दुर्घटना घडली. ही घटना पहाटे ५.३० वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. गौरीकुंडवरील गवत कापणाऱ्या एका नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली.

Published on: Jun 15, 2025 12:03 PM