BIG Breaking Nimisha Priya: भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली, कारण…
येमेनच्या कायद्यात ब्लड मनीची तरतूद आहे. म्हणजे आरोपी मृतकाच्या कुटुंबाला पैसा देऊन स्वत:ला वाचवू शकतो. यानुसार निमिषा प्रियाच्या कुटुंबाने तिला वाचवण्यासाठी पिडीत व्यक्ती तलाल अब्दो महदीच्या कुटुंबाला ८ कोटी ६ लाख देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी असलेली नर्स निमिषा प्रिया हिच्यासंदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय नर्स निमिषा प्रियाची येमेनमध्ये फाशी टळली आहे. उद्या भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र ही शिक्षा पुढील आदेश येईपर्यंत सुनावली जाणार नसल्याने निमिषा प्रियाला दिलासा मिळणार आहे. २००८ साली केरळमधून नोकरीच्या निमित्ताने निमिषा प्रिया येमेनमध्ये गेली होती. तिच्यावर अब्द महदीच्या हत्येचा आरोप कऱण्यात आला आहे. निमिषा प्रिया तेव्हापासून जेलमध्ये आहे. दरम्यान, या महिन्यातच निमिषाला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार होती. त्यानंतर निमिषा प्रियाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले. निमिषा प्रियाच्या कुटुंबाने तिला वाचवण्यासाठी पिडीत व्यक्ती तलाल अब्दो महदीच्या कुटुंबाला ब्लड मनी म्हणून ८ कोटी ६ लाख रूपये देण्याचा प्रस्ताव ठेवला होता मात्र हत्या झालेल्या व्यक्तीच्या परिवाराने हे पैसे घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
