Special Report | Kirit Somaiya यांचा सत्कार, टार्गेटवर Sanjay Raut, ठाकरे!-TV9
किरीट सोमय्यांचा पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने सत्कार केला. याच पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर आज भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्कार केला. मात्र आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे.
पुणे : किरीट सोमय्यांचा पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सर्व विरोध झुगारून भाजपने सत्कार केला. याच पायऱ्यांवर गेल्या शनिवारी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर आज भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्कार केला. मात्र आता काँग्रेसने त्या पायऱ्यावर गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून भाजपच्या स्टंबाजीचा निषेध केला आहे. किरीट सोमय्या यांच्या येण्यामुळे याठिकाणी मोठा राडा झाला. पुणेकरांच्या प्रश्नासाठी किरीट सोमय्या कधी आले नाहीत, मात्र आता फक्त कंगावा करायला सोय्या इथे येत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध आहे. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेसकडून देण्यात आलीय. तसेच आम आदमी पार्टीनेही पुण्यात महापालिकेसमोर आंदोलन केलं आहे. किरीट सोमय्या येणार होते म्हणून कुणालाही प्रवेश दिला नाही, गिरीश बापट दिडशे लोकं आत घेऊन घुसतात, हे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.
