अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी Kirit Somaiya दापोलीत दाखल

अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी Kirit Somaiya दापोलीत दाखल

| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 5:55 PM

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचं साई रिसॉर्ट तोडण्याच्या मागणीसाठी आता भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दापोलीत दाखल झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह मोठा ताफा सोमय्या यांच्यासोबत होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमय्यांना दापोलीत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. मात्र, मोठ्या ताफ्यानिशी […]

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचं साई रिसॉर्ट तोडण्याच्या मागणीसाठी आता भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दापोलीत दाखल झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह मोठा ताफा सोमय्या यांच्यासोबत होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमय्यांना दापोलीत पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला होता. मात्र, मोठ्या ताफ्यानिशी सोमय्या आज दापोलीत दाखल झाले. यावेळी अनिल परब यांचा रिसॉर्ट तर तोडणारच असा दावा सोमय्या यांनी केलाय. इतकंच नाही तर सोमय्या यांना यावेळी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलंय.