परब यांना भीती वाटत असली तरी ईडीचा बुलावा आल्यावर जावंच लागणार- किरीट सोमय्या

परब यांना भीती वाटत असली तरी ईडीचा बुलावा आल्यावर जावंच लागणार- किरीट सोमय्या

| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 1:44 PM

परिवहन मंत्री अनिल परब यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. आपल्या संपत्तीचा हिशोब देण्यासाठी अनिल परब यांना जावंच लागणार, असं विधान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलंय.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चौथ्यांदा ईडीसमोर हजर राहावं लागणार आहे. आतापर्यंत त्यांची तीन वेळा चौकशी झाली आहे. त्यांना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. आपल्या संपत्तीचा हिशोब देण्यासाठी अनिल परब यांना जावंच लागणार, असं विधान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलंय. परब यांना भीती वाटत असली तरी ईडीचा बुलावा आला तर जावंच लागणार, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी आणि अनिल परब यांच्यानंतर आता कोणाचा नंबर लागणार, अशी चर्चा सुरू असतानाच त्याविषयी सोमवारी कळेलच असं सोमय्या म्हणाले.