Kirit Somaiya | संजय पांडे,वांद्रे पोलीस निरीक्षक,DCP विरोधात कोर्टात जाणार;सोमय्यांचा इशारा

Kirit Somaiya | ‘संजय पांडे,वांद्रे पोलीस निरीक्षक,DCP विरोधात कोर्टात जाणार’;सोमय्यांचा इशारा

| Updated on: Apr 25, 2022 | 8:10 PM

आरोपी नंबर एक वांद्रे पोलीस स्टेशनचे सिनियर पोलिस इन्स्पेक्टर, डीसीपी आणि तिसरे खुद्द मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आहेत. हे सगळं नाटक सुरू आहे. काल काही शिवसैनिकांना अटक केले, चहा पाजला आणि सोडून दिले, असे किरीट सोमैया यांनी सांगितले.

मुंबई : वांद्रे पोलीस स्टेशनचे सीनिअर पोलिस इन्स्पेक्टर आणि डीसीपी यांनी माझ्या विरोधात खोटी एफआयआर दाखल केला आहे. त्यांना संजय पांडे केव्हा अटक करणार ही खोटी एफआयआर आहे, असं सांगितल्यानंतर त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली. उद्या मी संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करणार आहे. आणि त्यानंतर आम्ही कोर्टात जाणार आहोत. त्यात आरोपी नंबर एक वांद्रे पोलीस स्टेशनचे सिनियर पोलिस इन्स्पेक्टर, डीसीपी आणि तिसरे खुद्द मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आहेत. हे सगळं नाटक सुरू आहे. काल काही शिवसैनिकांना अटक केले, चहा पाजला आणि सोडून दिले, असे किरीट सोमैया यांनी सांगितले.