Kishori Pednekar | मुंबईतील शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये जुंपली

Kishori Pednekar | मुंबईतील शाळांमध्ये ‘मनाचे श्लोक’ सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये जुंपली

| Updated on: Apr 05, 2026 | 2:29 PM

उद्वव बाळासाहेब पक्षातील (UBT) प्रमुख नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या मुंबईतील शाळांसंदर्भातील प्रस्तावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनी मुंबईतील शाळामध्ये 'मनाचे श्लोक' सक्तचे करावे, अशी मागणी केली होती. आता याच मुद्यावर एमआयएम आणि ठाकरे गटात वादविवादाचे सत्र सुरु झाले आहे.

उद्वव बाळासाहेब पक्षातील (UBT) प्रमुख नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या मुंबईतील शाळांसंदर्भातील प्रस्तावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पेडणेकरांच्या प्रस्तावानुसार मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याची मागणी केली जात होती. मात्र आता यावर (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) MIM तीव्र विरोध दर्शवला आहे.

यासंदर्भात MIM पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ‘धर्माधारित नव्हे, तर संविधानाचे शिक्षण द्या’ अशी मागणी केली आहे. या मागणीवर किशोरी पेडणेकरांनी स्पष्ट केले की हे धर्माधारित किंवा हिंदूंचे धार्मिक श्लोक नाही. हे सर्व धर्मातील मुलांवर चागल्या संस्कारासाठी उपयुक्त ठरेल. किशोरी पेडणेकरांच्या या प्रस्तावावर 9 तारखेला BMCमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर आता 9 तारखेला होणाऱ्या चर्चेत नेमकं काय घडेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Published on: Apr 03, 2026 01:07 PM
Follow Us