Plane Emergency Landing : कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग
IndiGo Plane Emergency Landing : कोची येथून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग आता नागपूरमध्ये करण्यात आलं आहे.
नागपूर विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलं आहे. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलं आहे. विमानात बॉम्ब असल्याचा संशय असल्याने हे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आलं आहे. कोची येथून दिल्लीला हे विमान चाललं होतं. सध्या बॉम्ब शोधक पथक नागपूर विमानतळावर दाखल झालेलं आहे.
कोची येथून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या संशयानंतर इंडिगोच्या या विमानाचं इमर्जन्सी लॅंडींग नागपूर विमानतळावर करण्यात आलं आहे. या विमानात बॉम्ब असल्याची धमिकी मिळालेली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांचं श्वान पथक देखील याठिकाणी दाखल झालेलं आहे. काहीस संशयास्पद गोष्टी विमानात आहेत का याचा शोध आता घेतला जात आहे. तर विमानातील प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
Published on: Jun 17, 2025 01:10 PM
