Ladki Bahini Yojana : लाडक्या बहिणींनो… तुमची माहिती खरी ना… 26 लाख अर्जांची होणार तपासणी

Ladki Bahini Yojana : लाडक्या बहिणींनो… तुमची माहिती खरी ना… 26 लाख अर्जांची होणार तपासणी

| Updated on: Jul 30, 2025 | 11:30 AM

लाडकी बहिणी योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक करत आहेत तर दुसरीकडे सरकारने सर्व आरोप खोटे ठरवत बोगस लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचा इशारा दिलाय. मात्र बोगस अर्ज करून करणाऱ्या लाभ घेणाऱ्यांवर प्रशासनाचा कारवाई काय यावर आता सरकारचं मौन आहे.

लाडक्या बहिणींवरून आधीच विविध आरोप होत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांच विधान चर्चेत आलंय. महिला सबलीकरणासाठी आम्ही लाडकी योजना आणल्याचा दावा सरकारने केला होता, मात्र आता मंत्रीच पैशांवरून महिलांच्या सख्य्या भावांशी करू लागलेत. महिलांना रक्षाबंधनाला भाऊ पाचशे आणि भाऊ बिझलाही पाचशेच देतो मात्र आमचा सरकार दर महिन्याला तुम्हाला १५०० देतंय ही साधी गोष्ट आहे का? असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय.

दरम्यान आता लाडकी बहिणी योजनेमधील २६ लाख अर्जांची पडताळणी करून सरकार त्यावर योग्य ती कारवाई करणार आहे. म्हणजेच ज्यांनी चुकीची माहिती दिली असेल किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या असतील असे २६ लाख अर्ज सरकार तपासणार आहे. मात्र तसं असेल तर निवडणुकांच्या तोंडावर इतके लाखो अर्ज मंजूर कसे झाले? त्यावर सरकार काहीही बोलत नाहीये. बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करू असं सरकार म्हणतंय, बोगस कागदपत्र वेरीफाय न करता अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचं काय? यावर सरकार गप्प आहे. खोट्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेऊ म्हणत सरकारने इशारा दिलाय. मात्र ज्या यंत्रणेनं खोटी कागदपत्र मंजूर केली त्यांच काय? यावर सरकार गप्प आहे. बोगस लाभार्थ्यांना अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल का? या प्रश्नावर मंत्री अदिती तटकरेही उत्तर देत नाहीत.

Published on: Jul 30, 2025 11:30 AM