Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’नो Good News… महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणीं’नो Good News… महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून लाभार्थ्यी महिलांना मोठं गिफ्ट

| Updated on: Mar 04, 2025 | 5:37 PM

लाडकी बहिण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे फेब्रुवारी संपून मार्च महिना लागला मात्र अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. मात्र लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिला दिनाची खास भेट देण्यात येणार आहे. येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन देशासह राज्यभरात साजरा केला जाणार आहे. या महिला दिनाचं औचित्य साधत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना सरकारकडून हे डबल गिफ्ट मिळणार असल्याचे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

आदिती तटकरेंचं ट्वीट नेमकं काय?

लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल ! असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

Published on: Mar 04, 2025 05:33 PM