Laxman Hake : तेव्हा त्यांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर खोचक टीका

Laxman Hake : तेव्हा त्यांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर खोचक टीका

| Updated on: Jun 02, 2025 | 12:24 PM

Laxman Hake Slams Ajit Pawar : ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. अमोल मिटकेरी यांच्यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे.

ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार हे अमित शाह यांच्या रीचार्जवर चालतात असं हाके यांनी म्हंटलं आहे. आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का?  असा प्रश्न देखील हाके यांनी उपस्थित केला आहे. तसंच माझा दारूच्या बाटलीसोबतचा फोटो एआय जनरेटेड आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. अजितदादांनी दारूचा कारखाना बंद करावा, प्यायचा प्रश्न येतोच कुठे? असंही त्यांनी म्हंटलं. यावेळी हाके यांनी आमदार अमोल मिटकरी यांचा उल्लेख माकड असा केला आहे.

यावेळी हाके यांनी म्हंटलं की, आम्हाला निधी देताना तुमच्या हाताला लकवा मारतो का अजितदादा पवार? तुम्ही आर्थिक नियोजन करण्यासाठी आहात. जो समाज सोशीत आहे, पीडित आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही शिष्यवृत्ती मागतो आहे. आणि तुम्ही भुरटे, गरदुल्ले ज्यांना गावात कोणी विचारत नाही अशी माणसं माझ्यावर सोडताय? असं म्हणत हाके यांनी अमोल मिटकरी यांच्यावर देखील टीका केली आहे.

Published on: Jun 02, 2025 12:24 PM