Special Report | संजय राऊत, सुजित पाटकर यांच्यातील जमीन व्यवहार उघड

Special Report | संजय राऊत, सुजित पाटकर यांच्यातील जमीन व्यवहार उघड

| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 10:01 PM

गेल्या दोन दिवसांपासून किरीट सोमय्या विरूद्ध संजय राऊत असा सामना पहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या सुजित पाटकरांसोबत असलेल्या भागिदारीवरून किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. आता हा जमीनीचा सर्व व्यवहार समोर आला आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून किरीट सोमय्या विरूद्ध संजय राऊत असा सामना पहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या सुजित पाटकरांसोबत असलेल्या भागिदारीवरून किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी सोमय्या आणि ईडीवर निशाणा साधला होता. आता या सर्व पार्श्वभूमीवर सुजित पाटकर आणि संजय राऊत यांच्यामधील जमीनीचा व्यवहार समोर आला आहे. संजय राऊत यांच्या पत्नी आणि सुजित पाटकर यांच्या पत्नी या दोघींनी मिळून ती जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट .